Saturday, 27 May 2017

सर्वव्यापी सावरकर


विनायक दामोदर सावरकर हे फक्त नाव जरी घेतल की डोळ्यासमोर उभा राहतो एक धगधगता क्रांतिसूर्य. उभ आयुष्य देशाच्या,हिंदू समाजाच्या उद्धारासाठी आयुष्य खर्ची घातलेला स्वातंत्र्यविर. इतक असुनही सावरकर हे नाव घेताना सुधा आजही काही 'धर्मनिरपेक्ष' लोकाना संकोच वाटतो. त्यांचि प्रतिमा संसेदत लावताना ठरवून द्वेषबुद्धीने विरोध केला जातो. विरोध करानाऱ्या द्वेष्ट्या पैकी निम्म्यानि सुधा सावरकर वाचलेले नसतात. कारण त्यानी वाचले असते तर विरोध केलाच नसता. सावरकर जितके तुम्ही वाचत जाल तितके ते तुम्हाला आपले वाटत जातील. त्यांच्या 'माझी जन्मठेप' मधला प्रत्येक अनुभव अंगावर रोमांच उभा करेल. 'सागरा प्राण तळमळला' वाचताना,ऐकताना तुम्ही हळहळल्या शिवाय राहणार नाही.'जयोस्तुते'चा एक एक शब्द चेतना जागवतो. सशस्त्र क्रांतिला असलेले त्यांचे योगदान,लंडन मधे राहून केलेल क्रांतिकार्य हे आजही प्रेरणादायी राहिल ठरेल असेच आहे.
हिंदुत्व हा शब्द सावकरांच्या उल्लेखा शिवाय पूर्ण होत नाही. नास्तिक असलेल्या सावरकरानि आयुष्यभर हिंदूत्वाचा पुरस्कार केला. सावरकरांच्या हिंदूत्व या संकलपनेचा प्रत्येकजण आपल्या परीने अर्थ घेत असतोय. सावरकराना अभिप्रेत असलेला हिंदू शब्दाचा अर्थ हा सर्वव्यापी आहे. हिंदूस्थानला पितृभू आणि पुण्यभू मानननाऱ्या प्रत्येकाला ते हिंदू म्हणतात. हिंदूत्व हे आपल्या परंपरा,संस्कृति यांच प्रतिक मानतात. इतकी व्यापक आणि सर्वाना सोबत घेउन जाणारी दूसरी हिंदूत्वाची व्याख्या कोणीही केलि नसेल. शिवाजी महाराजाना 'हिंदू नृसिंह' संबोधनाऱ्या सावरकरानि हिंदूचा शौर्याचा गौरवशाली इतिहास 'सहा सोनेरी पाने' मधून मांडलाय. त्याबरोबरच 'क्ष-किरणे मधून हिंदू धर्मातल्या अनिष्ठ रुढी परंपरांचि कठोर चिकत्सा करायला सावरकर कुठेही कचरले नाहीत. गाईला देव माननाऱ्या धर्मांध हिंदुना उपोरधिकपणे त्यानी सुनावल आहे पण त्याचवेळी गाईला जर क्रूरपणे,द्वेषबुद्धीने कोणि मारत असेल तर त्याचा हात पकड़न हे आपल कर्तव्यच असल्याच सांगतात. दिवाळी सारख्या सणाच सास्कृतिक महत्व हि त्यानी सांगीतलय. सावरकर विज्ञाननिष्ठ आहेत. आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे सावरकर विज्ञानाचे महत्व जानुन होते. विज्ञानच मुस्लिम समाजातल्या धर्मवेडेपणाला आणि हिंदू समाजातल्या अनिष्ठ रुढीना संपवू शकतो याची त्याना खात्री होती.
ज्या एका क्षेत्रात नाव कमावन्यासाठी माणुस आयुष्यभर झटतो त्या प्रत्येक क्षेत्रात सावरकरानी नाव कोरुन ठेवलय. ते सिद्धहस्त कवि,नाटककार,इतिहासकार आहेत.  अटलबिहारी वाजपेयीनि एका भाषनात त्याना 'शब्दों के शिंपी' अस म्हंटलय,ते शब्द लिलया गुंफणारे तर होतेच पण शब्दांचे निर्मातेही होत. वार्ताहर,महापौर,उच्चांक,नगरसेवक,स्तंभ,दिग्दर्शक असे कितीतरी रोजच्या वापरातले शब्द सावरकरांचे आहेत. त्यांची 'भाषाशुद्धि' हा माय मराठीला लाभलेली देणगी आहे.
जाति हा हिंदू धर्माला असलेला शाप आहे. त्यासाठी सावरकरानी जात्युछेदनाची चळवळ चालू केलि. पतितपावन मंदिर,हिंदू बैंड,हळदी कुंकू समारंभ अशा अनेक मार्गानि त्यानी त्यांचा जात्युछेदनाचा लढा चालू ठेवला. आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करताना ते विज्ञानतल्या 'संकर' या संकल्पनेचा आधार देतात.
'मि मेल्यानंतर माझे शरीर विद्युतदाहिनित झोकुन द्या' अस सांगुन सावरकर त्यांच्या कृतिमधुन पुरोगामी ठरतात. 'विद्युतदाहिनी' हा शब्द सुधा त्यांचाच !
इतका सगळ असुनही केवळ राजकीय स्वार्थापायी उपेक्षित ठेवले गेलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे जगातले एकमेव क्रांतिकारक असावेत. आजही   सद्य सामाजिक स्थितिमधे पदोपदी सावरकरानी देऊन ठेवलेल्या ईशाऱ्यांचि आठवन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच आपण सगळ्यानिच सावरकरांचा विचार वाचुन आचरनात आणन गरजेच वाटत.    त्यांचे विचार चिरायू आहेतच फक्त आपण त्याला कृतिची,आचरनाची जोड़ द्यायची गरज आहे. राजकारन्यानि सुधा आपली वैयक्तिक स्वार्थ लांब ठरवत सावरकर विचारांचा यथोचित सन्मान करावा. त्यानी सांगीतल्या प्रमाने विज्ञानाचि कास धरत असतानाच ' सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ' हे तत्व सांगनाऱ्या आपल्या हिंदू संस्कृतिचा वारसा तुम्ही आम्ही अभिमानाने सांगितला पाहिजे,जोपासला पाहिजे. हिंदू म्हणून आपली असलेली सांस्कृतिक ओळख घेउन आपण जगासमोर जायला पाहिजे. हिंदू समाजाच्या गौरवशाली इतिहासाची परंपरा,सहिष्णुतेचि शिकवन घेउन जगापुढ गेल पाहिजे.
आज जयंती निमित्त स्वातंत्र्यवीराना विनम्र अभिवादन !